भजनी मालिका
← भजनांकडे परत

होऊनी आभारी । राहिलासे द्वारीं

houni abhari | rahilase dvarin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
होऊनी आभारी । राहिलासे द्वारीं ॥१॥ समचरण विटेवरी । कटीं धरुनियां कर ॥२॥ मिरवीं मस्तकीं भुषण । सिद्ध साधकांचे ध्यान ॥३॥ सुहास्य वदन चांगलें । एका जनार्दनी वंदिलें ॥४॥