भजनी मालिका

भजने

आशामनीषातृष्णा बांधिती दावणीं । सोडवी चक्रपाणीं संतसंगें ॥१॥ कामक्रोधालोभ याचा पसर । पाडिती विसर तुझा देवा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आशेपाशी काम आशेपाशीं क्रोध । आशेपाशी भेद लागलासे ॥१॥ आशेपाशीं कर्म । आशेपाशीं धर्म । आशेपाशीं नेम नानात्वाचा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आश्चर्य या वाटे नसत्या छंदाचें । कैचे दिलें साचें करोनियां ॥१॥ दुजियाचा तंव अकळ हा भाव । कराया तो जीव साक्षी येथ ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आश्रमविधि करावें पालन । परी विठठलाचें मन तीर्थाटणीं ॥१॥ जाणोनि अंतर म्हणे सिदोपंत । आपुले मनींचा हेत पुरता कीजे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

आश्वासिलें भक्ता दिलें सर्व सुख । बैसविले लोक विमानांत ॥१॥ नारी नर पशू जीवजंतु भुते । विमानीं समस्तें बैसविलीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आश्वासोनी देव बोलिले ध्रुवासी । इच्छा तुझी जैशी तैसें करूं ॥१॥ सहज सत्येनें ऐसें कांहीं जहालें । अढळ दिधलें बैसावया ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

आषाढी कार्तिकी हेचि आह्मां सुगी । शोभा पांडुरंगीं घनवटे ॥१॥ संतांचीं दर्शनें हेंचि पीक जाण । देतां आलिंगन देह निवे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

आषाढी पर्वकाळ । निघताती संतमेळ । करिती गदारोळ । विठ्ठलकीर्तनीं ॥१॥ धन्य धन्य त्यांचें कुळ । पावन ते सकळ । येवोनि उतावीळ । विठ्ठल भेटती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आषाढी पर्वकाळ एकादशी दिन । हरिजाग्रण देवा प्रिय ॥१॥ निराहारे जो व्रत करी आवडी । मोक्ष परवडी त्याचे घरीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आषाढी पर्वणी आला यात्राकाळ । निघाले सकळ वारकरी ॥१॥ यांचे समागमें जात असे खुळें । स्मरे वेळोवेळे विठ्ठासी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव