भजनी मालिका
← भजनांकडे परत

आश्रमविधि करावें पालन । परी विठठलाचें मन तीर्थाटणीं

ashramavidhi karaven palan | pari vithathalachen man tirthatanin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
आश्रमविधि करावें पालन । परी विठठलाचें मन तीर्थाटणीं ॥१॥ जाणोनि अंतर म्हणे सिदोपंत । आपुले मनींचा हेत पुरता कीजे ॥२॥ जावें हो सत्वर यावें स्वस्ति क्षेम । पावले आश्रम सिदोपंत ॥३॥ विठठलें गमन केलें तेव्हां तीर्थाटणा । मुख्य मुख्य स्थाना अनुक्रमें ॥४॥