भजनी मालिका
← भजनांकडे परत

आशेपाशी काम आशेपाशीं क्रोध । आशेपाशी भेद लागलासे

ashepashi kam ashepashin krodh | ashepashi bhed lagalase

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आशेपाशी काम आशेपाशीं क्रोध । आशेपाशी भेद लागलासे ॥१॥ आशेपाशीं कर्म । आशेपाशीं धर्म । आशेपाशीं नेम नानात्वाचा ॥२॥ आशेपाशीं याती आशेपाशीं जाती । आशेपाशीं वस्ती अहंकाराची ॥३॥ एका जनार्दनीं निराशी तो धन्य । ज्यासी नारायण सांभाळिता ॥४॥