भजनी मालिका
← भजनांकडे परत

आषाढी पर्वणी आला यात्राकाळ । निघाले सकळ वारकरी

ashadhi parvani ala yatrakal | nighale sakal varakari

रचनाकार: संत नामदेव · अभंग
आषाढी पर्वणी आला यात्राकाळ । निघाले सकळ वारकरी ॥१॥ यांचे समागमें जात असे खुळें । स्मरे वेळोवेळे विठ्ठासी ॥२॥ धन्य पुण्यतिथि आली एकादशी । पावले क्षेत्नासी विश्वजन ॥३॥ स्नानविधि करोनि समस्तां भेटला । कीर्तनीं बैसला हरिदास ॥४॥ निवृत्ति ज्ञानदेव सोपान सांवता । नामयाची कथा ऐकताती ॥५॥ तंव तो म्हणे करा नामाचा उच्चार । टाळीचा गजर करूनियां ॥६॥ गोरियाचे नेत्नीं आले जळबिंदु । मज कां गोविंदु विसरला ॥७॥ कां गा केशिराजा मोकलिलें मातें । शरण कोणातें जाऊं आतां ॥८॥ तुजविण मज न दिसे निर्वाणीं । माय बाप धई ग्ण गोत ॥९॥ आतां माझी लाज राखें पंढरीनाथा । तुजविण आतां कोणी नाहीं ॥१०॥ अनाथाचा नाथ दिनाचा कैवारी । पावला झडकरीं आपुल्या दासा ॥११॥ गोरियाचे हात आले तत्‌क्षणीं । गर्जोनि नामध्वनी उभा ठेला ॥१२॥ सकळ संत जनीं देखोनि नयनीं । टाळिया पिटोनि गर्जतती ॥१३॥ निधला म्हणती भक्त हा वैषणव । अघटीत भाव न कळे याचा ॥१४॥ कैसा येणें केला ऋणी पंढरीनाथा । आहे पंढरीनाथ याचे उदरीं ॥१५॥ पूर्वीं तो प्रर्‍हाद श्रवणीं ऐकिला । किंवा हा देखिला संतांमधीं ॥१६॥ नामा येऊनियां चरणासी लागला । ह्रदयीं आलिंगिला भक्तराज ॥१७॥