भजनी मालिका
← भजनांकडे परत

आश्वासिलें भक्ता दिलें सर्व सुख । बैसविले लोक विमानांत

ashvasilen bhakta dilen sarva sukh | baisavile lok vimanant

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आश्वासिलें भक्ता दिलें सर्व सुख । बैसविले लोक विमानांत ॥१॥ नारी नर पशू जीवजंतु भुते । विमानीं समस्तें बैसविलीं ॥२॥ पातली मोहनी म्हणे देवराया । सांडिसी कां वायां मजलागीं ॥३॥ कोण अपराध घडलासे मज । दीनानाथ साजे नाम तुम्हां ॥४॥ इंद्र आज्ञेमुळें छळियेलें राया । एका जनार्दनीं पायां लागतसे ॥५॥