भजनी मालिका
← भजनांकडे परत

आशेपाशीं नाहीं सुख । आशेपाशीं परम दुःख

ashepashin nahin sukh | ashepashin param duhkh

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आशेपाशीं नाहीं सुख । आशेपाशीं परम दुःख ॥१॥ आशा उपजली देवासी । तेणें नीचत्व आले त्यासी ॥२॥ आशेसाठीं जगदानी । मागें बळीसी स्वयें पाणी ॥३॥ एका जनार्दनीं आशा । तिनें गुंतविलेंक महेशा ॥४॥