भजनी मालिका

भजने

सुख सेजेवरि देव विश्रांति पहुडले । विश्रांतीसी गेले सकळ भक्त ॥१॥ ब्रह्मवीणा करीम घेऊनि ब्रह्मसुत । जाणवी एकांत नारदमुनी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

सुख हें नावडे आम्हां कोणा बळें । नेणसी अंधळें जालीशी तूं ॥१॥ भूक तहान कैसी राहिली निश्चळ । खुंटलें चपळ मन ठायीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

सुखकर मुर्ति रुप रेखेवीण । उभा असे व्यापुन ब्रह्मांडी गे माय ॥१॥ वेधला जीऊ तयाचिया गुणा । क्षणभरी न बिसंबे दिवकीनंदना ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सुखरुप धन्य जाणावा संसारी । सदा वाचे हरि उच्चारी जो ॥१॥ रामकृष्णानाम वदे वेळोवेळां । हृदयीं कळवळां संतभेटी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सुखरूप असतां म्हणे माझें माझें । संकट देखोनियां घाली देवावरी वोझें ॥१॥ पापी तो अधममती । कदा नेणे नामस्मरण गती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सुखरूप ऐसें कोण दुजें सांगा । माझ्या पांडुरंगा सारिकें तें ॥१॥ न लगे हिंडणें मुंडणें ते कांहीं । साधनाची नाहीं आटाआटी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

सुखवोनि पतंग दीपावरी पडे । परि शेवटीं जोडे देह अंत ॥१॥ तैसे प्राणिमात्र संसारीं भुलले । कष्ट ते उगले करिताती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सुखाचा निज ठेवा तुमचा केशला । भाग्यें नामदेवा जोडलासी ॥१॥ तेणें तुझी सेवा केली मनोभावें । म्हणोनिया देणें घेतली धांव ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

सुखाचा सद्‌गुरु सुखरूप खेचरू । स्वरूप साक्षात्कारु दाखविला ॥१॥ विठ्ठल पहातां मावळलें मन । ध्यानीं भरले नयन तन्मय जालें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव