भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुखाचा निज ठेवा तुमचा केशला । भाग्यें नामदेवा जोडलासी

sukhacha nij theva tumacha keshala | bhagyen namadeva jodalasi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
सुखाचा निज ठेवा तुमचा केशला । भाग्यें नामदेवा जोडलासी ॥१॥ तेणें तुझी सेवा केली मनोभावें । म्हणोनिया देणें घेतली धांव ॥२॥ उदंड हें निधन निक्षेपें ठेविलें । थोडें बहूत दिधलें भाग्यवंता ॥३॥ अभिलाषी वस्तु तुझें पायीं ठेविलीं । ते आम्हा उगवली म्हणे विठा ॥४॥