भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुखाचा सद्‌गुरु सुखरूप खेचरू । स्वरूप साक्षात्कारु दाखविला

sukhacha sad‌guru sukharup khecharu | svarup sakshatkaru dakhavila

रचनाकार: संत नामदेव · अभंग
सुखाचा सद्‌गुरु सुखरूप खेचरू । स्वरूप साक्षात्कारु दाखविला ॥१॥ विठ्ठल पहातां मावळलें मन । ध्यानीं भरले नयन तन्मय जालें ॥२॥ मी माझें होतें तें मजमाजि निमालें । जळें जळ गिळिलें जयापरी ॥३॥ तेथें आनंदीं आनंदु वोळला परमानंदु । नाम्या जाला बोधु विठ्ठलनामें ॥४॥