भजनी मालिका
← भजनांकडे परत

सर्वांग साजिरीं आहेती इंद्रियें । तंव सावध होय हरीकथे

sarvang sajirin aheti indriyen | tanv savadh hoy harikathe

रचनाकार: संत नामदेव · अभंग
सर्वांग साजिरीं आहेती इंद्रियें । तंव सावध होय हरीकथे ॥१॥ कीर्तन नर्तन वाचे जनार्दन । न पावसी पतन येरझारीं ॥२॥ पूर्ण मनोरथ घडती एका नामें । दाटले सप्रेमें जीवन हेतु ॥३॥ नामा म्हणे विलास न करी तूं आणिक । सर्वीं सर्वां येक नाम असे ॥४॥