भजनी मालिका
← भजनांकडे परत

सर्वांघटी वसे तो आम्हां प्रकाशे

sarvanghati vase to amhan prakashe

सर्वांघटी वसे तो आम्हां प्रकाशे । प्रत्यक्ष आम्हां दिसे गुरुकृपा ॥ १ ॥ विरालें ते ध्येय ध्यान गेलें मनीं । मनाची उन्मनि एक जाली ॥ २ ॥ ठेला अहंभाव सर्व दिसे देव । निःसंदेह भाव नाहीं आम्हां ॥ ३ ॥ निवृत्ति साधन गयनिप्रसादें । सर्व हा गोविन्द सांगतुसे ॥ ४ ॥