भजनी मालिका
← भजनांकडे परत

माया ब्रम्ह ऐसें म्हणती धर्मठक । आपणासरिसे लोक नागविले

maya bramha aisen mhanati dharmathak | apanasarise lok nagavile

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
माया ब्रम्ह ऐसें म्हणती धर्मठक । आपणासरिसे लोक नागविले ॥१॥ विषयीं लंपट शिकवी कुविद्या । मनामागें नांद्या होऊनि फिरे ॥ध्रु.॥ करुनी खातां पाक जिरे सुरण राई । करितां अतित्याई दुःख पावे ॥२॥ औषध द्यावया चाळविलें बाळा । दावूनियां गुळा दृष्टीपुढें ॥३॥ तरावया आधीं शोधा वेदवाणी । वांजट बोलणीं वारा त्यांचीं ॥४॥ तुका म्हणे जयां पिंडाचें पाळण । न घडे नारायणभेट तयां ॥५॥