भजनी मालिका
← भजनांकडे परत

मंदिरा नेवोनि पलंगीं बैसविला । म्हणत हरीला तये-वेळीं

mandira nevoni palangin baisavila | mhanat harila taye-velin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
मंदिरा नेवोनि पलंगीं बैसविला । म्हणत हरीला तये-वेळीं ॥१॥ ऐसिया समयीं थोर तूं अससी । तरी ह्लषिकेशी बरें होतें ॥२॥ देखोनि तिचा भाव थोर झाला हरी । पाहूनि सुंदरी आन-दली ॥३॥ सुखशयनीं राधा एकांतीं असतां । अनया अवचिता आला तेथें ॥४॥ सक्रोध होऊनि बोलला राधेसी । कोणासी बोलसी गुजगोष्टी ॥५॥ भ्रताराचा शब्द ऐकतां श्रवणी । दचकली मनीं रा-धिका ते ॥६॥ हात जोडोनियां विनवित हरीसी । होईं ह्लषिकेशी सान आतां ॥७॥ ऐकोनि करुणा बाळ झाला हरी । दहिंभात झडकरी ठेवीं पुढें ॥८॥ कवाड उघडून बोलत अनयासी । घरांत ह्लषिकेशी जेवितसे ॥९॥ कावड ठेऊनि घरांत तो आला । जेवितां देखिला कृष्णनाथ ॥१०॥ नामा ह्मणे अनया आनंदला मनीं । ह्लदयीं चक्रपाणी धरियेला ॥११॥