भजनी मालिका
← भजनांकडे परत

मथनीचें नवनीत । सर्व हितकारक

mathanichen navanit | sarva hitakarak

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मथनीचें नवनीत । सर्व हितकारक ॥१॥ दंडवत दंडा परी । मागें उरी नुरावी ॥ध्रु.॥ वचनाचा तो पसरुं काई । तांतडी डोईपाशींच ॥२॥ तुका म्हणे जगजेठी । लावीं कंठीं उचलूनि ॥३॥