भजनी मालिका
← भजनांकडे परत

मंदोदरी करी विनंती । परिसा स्वामी लंकापती

mandodari kari vinanti | parisa svami lankapati

रचनाकार: संत नामदेव · अभंग
मंदोदरी करी विनंती । परिसा स्वामी लंकापती ॥१॥ सोडा रामाची अंतुरी । जंव तो राम आहे दुरी ॥२॥ उदकीं तारिले पाषाण । हा तो प्रताप नव्हे सान ॥३॥ झाला बिभीषण शाहाणा । देखोनी तुमच्या दुश्चिंतपणा ॥४॥ जाउनी रामासी भेटला । मृत्युपासूनि सुटला ॥५॥ नामयास्वामी रघुनंदन । वेगीं करावा प्रसन्न ॥६॥