भजनी मालिका
← भजनांकडे परत

भजूं एका विठोबास । आणिक न करूं अभ्यास

bhajun eka vithobas | anik na karun abhyas

रचनाकार: संत नामदेव · अभंग
भजूं एका विठोबास । आणिक न करूं अभ्यास ॥१॥ येथें साधन आहे एक । पाहों विठोबाचें मुख ॥२॥ वर्णूं हरीचे पवाडे । काळ लावूं देशधडे ॥३॥ नामा विष्णुदास ह्मणे । ऐसें करूम हरीकीर्तन ॥४॥