भजनी मालिका
← भजनांकडे परत

भय नाही हरीच्या दासा । शुभ काळ सर्व दिशा

bhay nahi harichya dasa | shubh kal sarva disha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
भय नाही हरीच्या दासा । शुभ काळ सर्व दिशा ॥१॥ नाहीं तयां गोंवागुंतीं । न लगे पुराण व्युत्पत्ती ॥२॥ नाहीं शास्त्रांचे कारण । वेदाभ्यासाचें नको मनन ॥३॥ एका जनार्दनीं शरण । परंपरा हेचि पूर्ण ॥४॥