भजनी मालिका
← भजनांकडे परत

परा ही पश्यंती मध्यमा वैखरी । वसे तो श्रीहरी पंढरीये देखा

para hi pashyanti madhyama vaikhari | vase to shrihari pandhariye dekha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
परा ही पश्यंती मध्यमा वैखरी । वसे तो श्रीहरी पंढरीये देखा ॥१॥ चारी वाच तय सदोदित गती । पुराणें भाडती अहोरात्र ॥२॥ वेद श्रुति नेति नेति म्हणताती । तो पुडंलिकापुढें प्रीती उभा असे ॥३॥ सनकसनंदन जयासी पै ध्याती । तो हरी बाळमूर्ति खेळतसे ॥४॥ योगियां ह्रुदयींचे ठेवणें सर्वथा । एक जनार्दनीं तत्त्वतां वोळखिलें ॥५॥