भजनी मालिका

भजने

न कळे केव्हां दिवस गेला । रात्रीं झाला तमनाश ॥१॥ निद्राचि नाहीं स्वप्न तें कैंचें । नि:शेष जागृतीचें विस्मरण ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

न कळे जयाचें विंदान । हरिहर नेणती महिमान । शिणलें शेषाचें वदन । तो तटस्थ राहिला ॥१॥ ऐसा आकळ त्रिभुवनीं । न कळे वेद शास्त्रां मनीं । पुराणांची आयणी । कुंठीत जाहली ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

न कळे पामरा कांहीं हा विचार । भोगावे अघोर किती जन्म ॥१॥ मरूनी जन्मावें मरूनी जन्मावें । पुनरापि मरावें वेरझारी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

न कळे लाघव तया मागें धांवे । तयांचे ऐकावे वचन देवें ॥१॥ देव तो अंकित भक्तजनांचा सदोदित साचा मागें धावें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

न कळेचि अदृष्टाची गती । न कळे कर्माकर्माची संभूती । न कळे मृत्यूचीही रीती । कैशी घडवील कोण वेळ ॥१॥ न कळे कर्माकमाची संभूती । न कळे होणार तें बळीवंत । भोगणें भोगवील अकस्मात् । न कळे विधीचेंही लिखित । जें कां रेखियलें निढळी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

न कळेचि प्रेम याची गोडी । धांवे तांतडी नाम घेतां ॥१॥ भरोनियां मन अंतरी राहे परताचि नोहे जवळुनी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

न कळेची मूढा सुखाची ती गोडी । पायीं पडली बेडी प्रपंचाची ॥१॥ पान लागलिया गूळ न म्हणे गोड । तैसे ते मूढ विसरले नाम ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

न चलति शब्द खुंटले पै वाद । एक तत्त्व भेद नाहीं रुपा ॥१॥ तें रुप पंढरी भरलें चराचरीं । माझा माजी घरीं बिंबलेंसे ॥२॥

न जायेचि ताठ नित्य खटाटोप । मंडुकीं वटवट तैसें ते गा ॥१॥ प्रेमाविण भजन नकाविण मोतीं । अर्थाविण पोथी वाचुनी कय ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

न देतां दरुशन गेला चक्रपाणी । राजाई तों मनीं दु:ख करी ॥१॥ न कळे कवणासी अघटित करणी । करुनी चक्रपाणी कां हो गेला ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ