भजनी मालिका
← भजनांकडे परत

न कळे जयाचें विंदान । हरिहर नेणती महिमान । शिणलें शेषाचें वदन । तो तटस्थ राहिला

na kale jayachen vindan | harihar nenati mahiman | shinalen sheshachen vadan | to tatastha rahila

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
न कळे जयाचें विंदान । हरिहर नेणती महिमान । शिणलें शेषाचें वदन । तो तटस्थ राहिला ॥१॥ ऐसा आकळ त्रिभुवनीं । न कळे वेद शास्त्रां मनीं । पुराणांची आयणी । कुंठीत जाहली ॥२॥ तो सोपा नाममंत्रें । वाचे वर्णितां पवित्रें । एका जनार्दनीं वक्त्रें । म्हणा रामकृष्ण हरी ॥३॥