भजनी मालिका
← भजनांकडे परत

न जायेचि ताठ नित्य खटाटोप । मंडुकीं वटवट तैसें ते गा

na jayechi tath nitya khatatop | mandukin vatavat taisen te ga

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
न जायेचि ताठ नित्य खटाटोप । मंडुकीं वटवट तैसें ते गा ॥१॥ प्रेमाविण भजन नकाविण मोतीं । अर्थाविण पोथी वाचुनी कय ॥२॥ कुंकुवा नाहीं ठाव म्हणे मी आहेव । भावविण देव कैसा पावे ॥३॥ नुतापविण भाव कैसा राहे । अनुभवे पाहे शोधुनियां ॥४॥ पाहतां पाहणें गेलें तें शोधुनी । एका जनार्दनीं अनुभविलें ॥५॥