भजनी मालिका
← भजनांकडे परत

न कळे पामरा कांहीं हा विचार । भोगावे अघोर किती जन्म

na kale pamara kanhin ha vichar | bhogave aghor kiti janma

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
न कळे पामरा कांहीं हा विचार । भोगावे अघोर किती जन्म ॥१॥ मरूनी जन्मावें मरूनी जन्मावें । पुनरापि मरावें वेरझारी ॥२॥ एका जनार्दनीं न मानी विश्वास । दृढ धरी पाश संसाराचा ॥३॥