भजनी मालिका
← भजनांकडे परत

अशौचीया जपो नये आणिकातें ऐको नये

ashauchiya japo naye anikaten aiko naye

अशौचीया जपो नये आणिकातें ऐको नये । ऐसिया मंत्राते जग बिहे त्याचें फ़ळ थोडें परि क्षोभणें बहु । ऐसा मंत्रराज नव्हेरे रे ॥१॥ नारायण नाम नारायण नाम । नारायण नाम म्हणकारे रे ॥२॥ बाह्य उभारावी त्या वरी काहाळ लावावी । गातिया ऐकतिया उणीव येवों नेदावी । उत्तमापासुनि अंत्यजवरी । मुक्तीची सेल मागावीरेरे ॥३॥ काय कराल यागें न सिणावें योगें हें तों व्यसनचि वाउगें । नरहरि नरहरि उदंडा वाचा म्हणाल तरि कळिकाळ राहेल उगेरेरे ॥४॥ चरणीं गंगा जन्मली अहिल्या उध्दरली नामें प्रतिष्ठा पावली गिरिजा । सकळिकां साधना वरिष्ठ हें नाम मा मनीं भाव न धरी दुजारेरे ॥५॥ तीर्थी भजिजाल अमरीं पूजींजाल तुमचिया भावासारिखा देवो होईल । बापरखुमादेविवरु विठ्ठलु तुमचा ऋणवई म्हणतां नलजेरेरे ॥६॥