भजनी मालिका
← भजनांकडे परत

अष्टादश पुराणें सांगती बडिवार । नाम सारांचें सार कलियुगीं

ashtadash puranen sangati badivar | nam saranchen sar kaliyugin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अष्टादश पुराणें सांगती बडिवार । नाम सारांचें सार कलियुगीं ॥१॥ तारिले पातकी विश्र्वास घातकी । मुक्त झाले लोकीं तिहीं सत्य ॥२॥ सर्वांतर सार नामजपु निका । जनार्दनाचा एका घोकितसें ॥३॥