भजनी मालिका
← भजनांकडे परत

अष्टधातुवेगळा देखिला पुतळा । जिवींचा जिव्हाळा श्रीविठ्ठल

ashtadhatuvegala dekhila putala | jivincha jivhala shriviththal

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अष्टधातुवेगळा देखिला पुतळा । जिवींचा जिव्हाळा श्रीविठ्ठल ॥१॥ तयाचे चरणीं माझा दंडवत । घडो आणि चित्त जडो नामीं ॥२॥ एका जनार्दनीं देखिला डोळां । जावीं जीवनकळा विठ्ठल देवो ॥३॥