भजनी मालिका

भजने

तुझिया विनोदें आम्हांसी मरण । सोसियेला शीण बहु फेरे ॥१॥ आतां आपणें चि येसी तें करीन । नाम हें धरीन तुझें कंठीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

तुझिया संतांची अंगसंगति । ते शिणलिया विश्रांति संसारिया ॥१॥ श्रवण कीर्तन ध्यान घडे अनायासें । भेदभ्रम नासे तेचि क्षणीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

तुझिया सत्तेनें वेदांसी बोलणें । सूर्यासीं चालणें तु-झिया बळें ॥१॥ ऐसा तूं समर्थ ब्रह्मांडाचा धनी । वर्म हें जाणूनि शरण आलों ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

तुझिये चरणीं असती दोनी भाव । तरीच हा जीव नरककुंडीं ॥१॥ बोल बोले एक मनीं असे आणिक । तरी तयासी देख दोनी बाप ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

तुझी संगती नाहीं कामाची । मी सुदंरा कोवळ्या मनाची । मज दृष्टी होईल साची । मग तुझी घेइन चर्या ॥१॥ कसें वेड लाविलें कान्हों गोवळियां ॥धु॥

रचनाकार: संत एकनाथ

तुझी सत्ता आहे देहावरी समज माझेवरी तुझी कींचीत नाही ॥१॥ देह नव्हे मी माझे देह जाण । समजती मी देह अहंभाव ॥२॥

रचनाकार: संत विठाबाई

तुझे कीर्तना कोण जाय आतां । सख्या भगवंता कृपा करीं ॥१॥ भीष्म पहुडला शरांचे पंजरी । तया प्रश्र करी युधिष्ठिर ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

तुझें गुणनाम ऐकतां श्रवण नाराध्ये । अवलोकन करित नयन नाराध्ये । पूजन करितां कर नाराध्ये । ऐसी नाराणुक द्यावी कमळापती ॥धु०॥

रचनाकार: संत नामदेव