भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुझी नाहीं केली सेवा । दुख वाटतसे जीवा

tujhi nahin keli seva | dukh vatatase jiva

रचनाकार: संत नामदेव · अभंग
तुझी नाहीं केली सेवा । दुख वाटतसे जीवा ॥१॥ नष्ट पापीण मी हीन । नाहीं केलें तुझें ध्यान ॥२॥ जें जें दु:ख झालें मला । तें तूं सोशिलें विठ्ठला ॥३॥ क्षमा करीं देवराया । दासी जनी लागे पायां ॥४॥