भजनी मालिका

भजने

उद्धवासे एकांतीं बोले गुज सांवळा । गोकुळासी जाऊनी बोधीं सुंदरीं गोपीबाळा । रथीं बैसोनी निघाला वेगीं पावला गोकुळां । तो उद्धव देखोनी दृष्टी गोपींन वेढींला ॥१॥

रचनाकार: संत एकनाथ

उद्धिग्न मनीं करी दीर्घ ध्वनी । नाहीं माझें कोणी सखे ऐसें ॥१॥ वैराग्य कसवटी सोसवेना घाये । पळावया पाये मार्ग काढी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

उद्योगाची धांव बैसली आसनीं । पडिलें नारायणीं मोटळें हें ॥१॥ सकळ निश्चिंती जाली हा भरवसा । नाहीं गर्भवासा येणें ऐसा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

उद्वेगासी बहु फांकती मारग । नव्हे ऐसें अंग माझें होतें ॥१॥ आतां कोण यासी करणें विचार । तो देखा साचार पांडुरंगा ॥ध्रु॥

रचनाकार: संत तुकाराम

उन्मनीचा हेलावा । तूर्या त्रिनयनीं दावावा । त्रिगुण तूर्या सांठवावा । तें कारण उन्मनीं ॥१॥ हातीं देऊनी बावन कस । भुमंडळईं फिरवा भलत्यास । नाहें लांछन हीनकसास । बाळकांस तेंवें तें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

उपकारासाटीं बोलों हे उपाय । येणेंविण काय आम्हां चाड ॥१॥ बुडतां हे जन न देखवे डोळां । येतो कळवळा म्हणउनि ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

उपकारी असे आरोनी उरला । आपुलें तयाला पर नाहीं ॥१॥ लाभावरी घ्यावें सांपडलें काम । आपला तो श्रम न विचारी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

उपजले विटळीं मेले ते विटाळीं । राहिले विटाळीं ते ही जाती ॥१॥ रडती पडती ते ही वेगें मरती । परि नाम न गाती भुली भ्रमें ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

उपजल्या काळें शुभ कां शकुन । आतां आवरोन राहिलेती ॥१॥ नाहीं मागितली वचनाची जोडी । निष्काम रोकडी वरीवरी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

उपजों मरों हे तों आमुची मिरासी । हें तूं निवारिसी तरी थोर ॥१॥ उभा राहीं करीं खरा खोटा वाद । आम्ही जालों निंद लंडपणें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

उपजोनि प्राणी गुंतला संसारीं । आपुला आपण वैरी होय रया ॥१॥ न कळे पामरा नरकाचें तूं मूळ । विषय सुख अमंगळ भोगी रया ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ