भजनी मालिका
← भजनांकडे परत

उद्विग्न मनीं करी दीर्घ ध्वनी

udvigna manin kari dirgha dhvani

उद्विग्न मनीं करी दीर्घ ध्वनी । नाहीं माझें कोणी सखे ऐसें ॥१॥ वैराग्य कसवटी सोसवेना घाये । पळावया पाये मार्ग काढी॥२॥ जाले चाळाचूळ मनांत चंचळ । युगा ऐसें पळ वाटतसे ॥३॥ नामा म्हणे जावें पळोनियां । आतां संतसंग होतां भाजतील ॥४॥ म्हणे मुक्ताबाई चैतन्याचा । कर ब्रह्म अधीवर चेतवावा॥५॥