भजनी मालिका
← भजनांकडे परत

उपचारासी वांज जालों । नका बोलों यावरी

upacharasi vanj jalon | naka bolon yavari

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
उपचारासी वांज जालों । नका बोलों यावरी ॥१॥ असेल तें असो तैसें । भेटीसरिसें नमन ॥ध्रु.॥ दुसऱ्यामध्यें कोण मिळे । छंद चाळे बहु मतें ॥२॥ एकाएकीं आतां तुका । लौकिका या बाहेरी ॥३॥