भजनी मालिका
← भजनांकडे परत

उपकारासाटीं बोलों हे उपाय । येणेंविण काय आम्हां चाड

upakarasatin bolon he upay | yenenvin kay amhan chad

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
उपकारासाटीं बोलों हे उपाय । येणेंविण काय आम्हां चाड ॥१॥ बुडतां हे जन न देखवे डोळां । येतो कळवळा म्हणउनि ॥२॥ तुका म्हणे माझे देखतिल डोळे । भोग देते वेळे येईल कळों ॥३॥