भजनी मालिका
← भजनांकडे परत

उपजोनि प्राणी गुंतला संसारीं । आपुला आपण वैरी होय रया

upajoni prani guntala sansarin | apula apan vairi hoy raya

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
उपजोनि प्राणी गुंतला संसारीं । आपुला आपण वैरी होय रया ॥१॥ न कळे पामरा नरकाचें तूं मूळ । विषय सुख अमंगळ भोगी रया ॥२॥ नाथिलिया प्रपंचा गुंतला बराडी । सैर वोढावोढी होईल रया ॥३॥ न कळे तयासी जाहला बुद्धिहीन । माझें माझें कवळोन रडे रया ॥४॥ एका जनार्दनीं अभागी पामर । भोगितीक अघोर नरक रया ॥५॥