भजनी मालिका

भजने

अणुरेणु पासोनि ब्रह्मांडी भरला । तो म्यां देखिला विटेवरी ॥१॥ स्थावर जंगम भरुनी उरला । तो म्यां देखिला पंढरीये ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अणुरेनुपासोनी सब्राह्म भरला । भरुनी उरला संतापुढें ॥१॥ उघडाची दिसे सर्वा ठायीं वसे । मागणेंचि नसे दुजें कांहीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अंत:करणीं विष्णु तोचि आत्मा असे । चंद्रमा भासे मन तेंची ॥१॥ बुद्धि ब्रह्मदेव चित्त नारायण । अहंकार जाण रुद्र-रूप ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

अंतर बाहेर कळलें स्वरुपं । स्वयें नंदादीप उजळिला ॥१॥ येणें जाणें कोठें योगी पहा अवीट । सान वैकुंठ करुनि ठेवी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

अंतर बाहेर भाजूं आम्ही कुंभ । भरू निरालंब सगळेची ॥१॥ अहं सोहं उर्ध्व लाउनी फुंकणी । नेत्रद्वारें फुंकुनी जाळ करूं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

अंतरयामीं जाणे सर्वोचा जो साक्षी । रडताती पक्षी मजसाठीं ॥१॥ पाहूनियां प्रेमा भुलला गोविंद । रडतसे मंदमंद तेव्हां ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

अंतरली खुटी मेटी । भय धरूनियां पोटीं । म्हणतां जगजेठी । धांवें करुणाउत्तरीं ॥१॥ बाप बळिया शिरोमणी । उतावळि या वचनीं । पडलिया कानीं । धांवा न करी आळस ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

अंतराय पडे गोविंदीं अंतर । जो जो घ्यावा भार तो तो बाधी ॥१॥ बैसलिये ठायीं आठवीन पाय । पाहीन तो ठाय तुझा देवा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

अंतरीं आवेश धरूनि कामाचा । लटकी जल्पे वाचा शब्द ज्ञानें ॥१॥ बोलाचे पैं मांडे क्षीर घारी अन्न । तेणें समाधान केविं होय ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

अंतरीं नमप एकनाथ करी । धन्य धन्य वैखरी वदलिसे ॥१॥ लटिका व्यवहार सव्र हा संसार । मायेचा प्रसर मृगजळ ॥२॥

रचनाकार: संत निळोबा