भजनी मालिका
← भजनांकडे परत

अंतर बाहेर कळलें स्वरुपं । स्वयें नंदादीप उजळिला

antar baher kalalen svarupan | svayen nandadip ujalila

रचनाकार: संत नामदेव · अभंग
अंतर बाहेर कळलें स्वरुपं । स्वयें नंदादीप उजळिला ॥१॥ येणें जाणें कोठें योगी पहा अवीट । सान वैकुंठ करुनि ठेवी ॥२॥ ज्ञानियाला मरण म्हणती अज्ञान । वायां तुम्ही शीण करुं नका ॥३॥ घटाचिया योर्गे प्रतिबिंब भासे । काय म्हणे नासे निरालंब ॥४॥ दर्पणाचे योर्गे दुसरें देखणें । काय मुखें दोन त्यांसी जालीम ॥५॥ दृष्याचियामुळें जीव दिसे येथें । काय पा परमार्थ विटंबले ॥६॥ तंतूचियामुळें पटाला विस्तार । काय निराकार वायां गेलें ॥७॥ रुक्मादेवीवरें केलें समाधान । नामा म्हणे मौन धरुनि ठेले ॥८॥