भजनी मालिका
← भजनांकडे परत

अंत:करणीं विष्णु तोचि आत्मा असे । चंद्रमा भासे मन तेंची

ant:karanin vishnu tochi atma ase | chandrama bhase man tenchi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
अंत:करणीं विष्णु तोचि आत्मा असे । चंद्रमा भासे मन तेंची ॥१॥ बुद्धि ब्रह्मदेव चित्त नारायण । अहंकार जाण रुद्र-रूप ॥२॥ ज्ञान आ मे पांच ज्ञानीं ओळखावे । पांच ते पाहावे कर्म-स्थानीं ॥३॥ नामा ह्मणे कैसें दाखऊं उघडें । वाटतसे कोडें मज आतां ॥४॥