भजनी मालिका
← भजनांकडे परत

अंतराय पडे गोविंदीं अंतर । जो जो घ्यावा भार तो तो बाधी

antaray pade govindin antar | jo jo ghyava bhar to to badhi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
अंतराय पडे गोविंदीं अंतर । जो जो घ्यावा भार तो तो बाधी ॥१॥ बैसलिये ठायीं आठवीन पाय । पाहीन तो ठाय तुझा देवा ॥ध्रु.॥ अखंड तें खंडे संकल्पीं विकल्प । मनोजन्य पाप रज्जुसर्प ॥२॥ तुका म्हणे विधी विश्वंभर वसे । राहों ऐसे दशे सुखरूप ॥३॥