भजनी मालिका

भजने

आशा तृष्णा माया अपमानाचें बीज । नासिलिया पूज्य होईजेतें ॥१॥ अधीरासी नाहीं चालों जातां मान । दुर्लभ दर्शन धीर त्याचें ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

आशा तृष्णा माया नाहीं लिथाडिल्या । ह्मणावा तो भला कासयानें ॥१॥ अमृत सेवितां मृत्यु पळे दुरी । सुख होय तरीं तेंचि नाम ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

आशा तृष्णा व्याघ्र देखोनियां डोळा । जालेंसे व्याकुळ चित्त माझें ॥१॥ पावें गा विठोबा पावेंज गा विठोबा । पावें गा विठोबा मायबापा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

आशा ते करविते बुद्धीचा तो लोप । संदेह तें पाप कैसें नव्हे ॥१॥ आपुला आपण करावा विचार । प्रसन्न तें सार मन ग्वाही ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आशा धरुनि आलों येथवरी । पाहतां पंढरी पाव्न झालों ॥१॥ आलिया जन्माचें सुफळ झालें काज । दृष्टी गरुडध्वज पाहतांचि ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आशा पाश देवा नको या संसारी । नका चौर्‍यायंशीं फेरी वेरझार ॥१॥ सोडवी देवा कुंसगा टाकुन । मन तें उन्मन तुझे चरणीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आशा मनिषा तृष्णा लागलीसे पाठीं । धांव जगजेठी स्वामी माझ्या ॥१॥ गेलासि केउता वाढिलें दुश्चिता । अगा कृपावंता स्वामी माझ्या ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

आशा मनीषाचा विरह लागला । तेणें सांवळा दुरी ठेला । जवळी असोनी बोलती अबला । कवणें गुणें कान्हु रुसला ॥१॥

रचनाकार: संत एकनाथ

आशा हे समूळ खाणोनि काढावी । तेव्हांचि गोसावी व्हावें तेणें ॥१॥ नाहीं तरी सुखें असावें संसारीं । फजिती दुसरी करूं नये ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आशापाश सोडोनि देई । संतासीं तूं शरण जाईं । चौर्‍याशींचें भय नाहीं । प्राणिया तुज ॥१॥ आवडी धरीं संतसंग । कामक्रोधा होय भंग । षडवैरीयां मार्ग । मोकळाची ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आशाबद्ध आम्ही भाकितसों कींव । तत्पर हा जीव कार्यापाशीं ॥१॥ प्रतिउत्तराची पाहातसें वाट । करूनि बोभाट महाद्वारीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आशाबद्ध करिती देवाचें पूजन । तेणें नारायण तुष्ट नोहे ॥१॥ आशाबद्ध करिती वेदाचें पठन । तेणें नारायण तुष्ट नोहे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आशाबद्ध तो जगाचा दास । पूज्य तो उदास सर्वजना ॥१॥ आहे तें अधीन आपुले हातीं । आणिकां ठेविती काय बोला ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आशाबद्ध बहु असे निलाजिरें । होय म्हणें धीरें फळ टोंकें ॥१॥ कारणापें चित्त न पाहें अपमान । चित्त समाधान लाभासाठी ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

आशाबध्द देखोनियां विटताती लोक । दयावयासी भीक नाहीं म्हणुन ॥१॥ तैसे तुहमी नव्हे लक्ष्मीचे कांत । सदा भाग्यवंत औदायेंसी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

आशाबध्दाचिया मुखें । निघे अक्षर तें तें फिकें ॥१॥ श्रवणीं बैसोनियां श्रोता । विटे ऐकुनी त्याची कथा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा