भजनी मालिका
← भजनांकडे परत

आशा ते करविते बुद्धीचा तो लोप । संदेह तें पाप कैसें नव्हे

asha te karavite buddhicha to lop | sandeh ten pap kaisen navhe

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आशा ते करविते बुद्धीचा तो लोप । संदेह तें पाप कैसें नव्हे ॥१॥ आपुला आपण करावा विचार । प्रसन्न तें सार मन ग्वाही ॥ध्रु.॥ नांवें रूपें अंगीं लाविला विटाळ । होतें ते निर्मळ शुद्ध बुद्ध ॥२॥ अंधळ्यासी नये देखण्याची चाली । चालों ऐसी बोली तुका बोले ॥३॥