भजनी मालिका
← भजनांकडे परत

आशा तृष्णा माया अपमानाचें बीज । नासिलिया पूज्य होईजेतें

asha trushna maya apamanachen bij | nasiliya pujya hoijeten

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आशा तृष्णा माया अपमानाचें बीज । नासिलिया पूज्य होईजेतें ॥१॥ अधीरासी नाहीं चालों जातां मान । दुर्लभ दर्शन धीर त्याचें ॥२॥ तुका म्हणे नाहीं आणिकांसी बोल । वांयां जाय मोल बुद्धीपाशीं ॥३॥