भजनी मालिका
← भजनांकडे परत

आशा मनिषा तृष्णा लागलीसे पाठीं । धांव जगजेठी स्वामी माझ्या

asha manisha trushna lagalise pathin | dhanv jagajethi svami majhya

रचनाकार: संत नामदेव · अभंग
आशा मनिषा तृष्णा लागलीसे पाठीं । धांव जगजेठी स्वामी माझ्या ॥१॥ गेलासि केउता वाढिलें दुश्चिता । अगा कृपावंता स्वामी माझ्या ॥२॥ नामा म्हणे मज नाहीं कोण गत । तारिसी अनंत स्वामी माझ्या ॥३॥