भजनी मालिका
← भजनांकडे परत

आशा धरुनि आलों येथवरी । पाहतां पंढरी पाव्न झालों

asha dharuni alon yethavari | pahatan pandhari pavna jhalon

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आशा धरुनि आलों येथवरी । पाहतां पंढरी पाव्न झालों ॥१॥ आलिया जन्माचें सुफळ झालें काज । दृष्टी गरुडध्वज पाहतांचि ॥२॥ एका जनार्दनीं पावलो विश्रांति । पाहतां विठठलमूर्ती भीमातटीं ॥३॥