भजनी मालिका
← भजनांकडे परत

आशाबद्ध आम्ही भाकितसों कींव । तत्पर हा जीव कार्यापाशीं

ashabaddha amhi bhakitason kinv | tatpar ha jiv karyapashin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आशाबद्ध आम्ही भाकितसों कींव । तत्पर हा जीव कार्यापाशीं ॥१॥ प्रतिउत्तराची पाहातसें वाट । करूनि बोभाट महाद्वारीं ॥ध्रु.॥ आपुल्या उचितें करूनियां ठेवीं । संबंध गोसावी तोडोनियां ॥२॥ तुका म्हणे एक झालिया निवाड । कोण बडबड करी मग ॥३॥