भजनी मालिका

भजने

येउनि आळंकावती केला क्षेत्रवास । देऊनी चित्तास समाधान ॥१॥ नित्य हरिकथा नामसंकीर्तन । संतांचे दरुशन सर्वकाळ ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

येउनी जाउनी पाहें तुजकडे । पडिल्या सांकडें नारायणा ॥१॥ आणीक कोणाचा मज नाहीं आधार । तुजवरी भार जीवें भावें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

येउनी नरदेहा गमविलें आयुष्य । नाहीं हृषीकेश स्मरला मनीं ॥१॥ मुखें नाहीं केलें देवाचें स्मरण । ऐसा अधम जन जाहलों देवा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

येउनी नरदेहा भूतातें पूजिती । परमात्मा नेणती महामुर्ख ॥१॥ दगडाच्या देवा सेंदुराचा भार । दाविती बडीवार पूजनाचा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

येउनी नरदेहासी वाचे उच्चारी ज्ञानेश्वर । तयाचा संसार सुफळ झालागे माये ॥१॥ प्रत्यक्ष परब्रह्म येऊनी अवतारासी । तारिलें जगासी नाममात्रें ॥ २॥

रचनाकार: संत सेना

येऊं द्या जी कांहीं वेसकरास । आंतून बाहेर वोजेचा घास ॥१॥ जों यावें तों हात चि रिता नाहीं । कधीं तरीं कांहीं द्यावें घ्यावें ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

येऊनि गर्भासी मेलों उपवासीं । नाहीं सखी ऐसी भेटली कोणी ॥१॥ देह जाणे अनित्य करावें स्वहित । मोहापासुनि निश्चित सोडवील ॥२॥

रचनाकार: संत सेना

येऊनि जाऊनि करी गौळणीचे कोड । पुरवूनि सकलही अंतरींची चाड । नेदी प्रेम त्याचें खंडो करी वाड । ऐसा कृपाळू हा सुखाचा सुरवाड वो ॥१॥ धन्यभाग्याचा त्या जन्मल्या संसारी । ज्यांचे ध्यानी मनीं नित्यकाळ हरी । करीतां काम काज दृष्टी यावरी । बोलतां चालतां जेवितां निरंतरीं वो ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

येऊनि नरदेहा झांकितील डोळे । बळें चि अंधळे होती लोक ॥१॥ उजडासरसी न चलती वाट । पुढील बोभाट जाणोनियां ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

येऊनि नरदेहा विचारावें सार । धरावा पैं धीर भजनमार्गा ॥१॥ चंचळ चत्तिासी ठेवूनियां ठायीं । संतांचिये पायीं लीन व्हावें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

येऊनि नरदेहीं वायां जाय । नेणें संतसंग कांहीं उपाय ॥कली वाढलासे अधम । ब्रह्माण सांडिती आपुलें कर्म ॥२॥ शुद्ध याति असोनि चित्त । सदा नीचाश्रय करीत ॥३॥

रचनाकार: संत एकनाथ

येऊनियां कांता सांगे गोरियासी । सहकुटुंबेंसी विठा नाहीं ॥१॥ मृत्तिका आणावयाची नाहीं जाहली वेळ । गेलासे समूळ न पडे दृष्टीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

येऊनियां कृपावंतें । तुकयास्वामी सुदुरुनाथें ॥१॥ हात ठेविला मस्तकीं । देउनी प्रसाद केलें सुखी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

येऊनियां गडी वंदिती कान्हया । आळंगितो तया बहुता गानें ॥१॥ चला जाऊं घरां हरीसवें चालती । आनंदें नाचती भोंवताले ॥२॥

रचनाकार: संत निळोबा