भजनी मालिका
← भजनांकडे परत

येउनी नरदेहा भूतातें पूजिती । परमात्मा नेणती महामुर्ख

yeuni naradeha bhutaten pujiti | paramatma nenati mahamurkha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
येउनी नरदेहा भूतातें पूजिती । परमात्मा नेणती महामुर्ख ॥१॥ दगडाच्या देवा सेंदुराचा भार । दाविती बडीवार पूजनाचा ॥२॥ रांडापोरें घेती नवासाची बगाड । नुगवे लिगाड तयाचेनि ॥३॥ आपण बुडती देवा बुडविती । अंतकाळी होती दैन्यावाणें ॥४॥ एका जनार्दनीं ऐसिया देवा । जो पूजी गाढवासम होय ॥५॥