भजनी मालिका
← भजनांकडे परत

येऊनि नरदेहीं वायां जाय । नेणें संतसंग कांहीं उपाय ॥कली वाढलासे अधम । ब्रह्माण सांडिती आपुलें कर्म

yeuni naradehin vayan jay | nenen santasang kanhin upay ||kali vadhalase adham | brahman sanditi apulen karma

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
येऊनि नरदेहीं वायां जाय । नेणें संतसंग कांहीं उपाय ॥कली वाढलासे अधम । ब्रह्माण सांडिती आपुलें कर्म ॥२॥ शुद्ध याति असोनि चित्त । सदा नीचाश्रय करीत ॥३॥ देवपूजा नेणें कर्म । न घडे स्नानसंध्या धर्म ॥४॥ ऐसा कलीचा महिमा । कोणी न करी कर्माकर्म ॥५॥ एका जनार्दन शरण । घडो संतसेवा जाण ॥६॥