भजनी मालिका
← भजनांकडे परत

येऊनि वर्‍हाडिणी बैसल्या टेकी

yeuni var‍hadini baisalya teki

येऊनि वर्‍हाडिणी बैसल्या टेकी । कोण तो नोवरा नाहीं वोळखी ॥१॥ मी कवणाची मज सांगा कोण्ही । वर्‍हाड आलिया वर्‍हाडणी ॥२॥ कवळ ते वरमाय कवण तो वरबाप । कवण तो नोवरा कवण तो मंडप ॥३॥ वर्‍हाड नव्हे स्वप्नगे माये । बापरखमादेविवराचे वेगी धरावे पाये ॥४॥