भजनी मालिका

भजने

निर्गुणींचें वैभव आलें भक्तिमिषें । तें हेम विठ्ठलवेषें ठसावलें ॥१॥ बरविया बरवें पाहतां नित्य नवें । ह्लदयीं ध्यातां निवे त्रिविधताप ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

निर्दय मानसी मारिताती दूत । कां रे चुकलेति रामनाम ॥१॥ प्रपंचाचे कामीं करूनि हव्यास। विसरला मुखास नाम घेतां ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

निर्धन धनातें कीं आंधळे लोचनातें । मयूर धनातें जेंवि भावी ॥१॥ पारधियें पाडस धरियलें वनीं । तें चिंती जननि रत्रंदिवस ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

निर्धारीतां सुख पंढरीसी आहे । म्हणोनि उभारिती बाह्मा वेदशास्त्रें ॥१॥ साधन पसारा न करी सैरावैरा । जाया तु निर्धारा पंढरीये ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

निर्धारे नेमेंसी करी एकादशी । तृणजीवन पशूंसी घेऊं नेदी ॥१॥ राष्ट्रामाजीं रुढी केली हरिभक्ती । दया सर्वांभूतीं समानची ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

निर्माणचि नाहीं त्याचें काय वर्णावें । जाणीवचि न रिघे तेथें काय जाणावें ॥१॥ म्हणऊनियां येथें अवघा खुंटला वाद । विरोनियां गेला अवघा अभेदीं भेद ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

निर्लज्ज होऊनि नाचे महाद्वारी । वाचें वदे हरी सर्वकाळ ॥१॥ व्रत करी सदा नामाचें पारणें । अखंड तें तेणें रामकृष्ण ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

निर्वाणींची हे सांगितली खूण । कैबल्य चरण विठो-बाचे ॥१॥ वेद शास्त्र स्मृति वदती पुराणें । पाहूनि जाणणें हेंचि सत्य ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

निर्विकल्प निराकारू । नि:शून्य निराधारू । निर्गुण अपरंपारु । चिदानंद सांबळें ॥१॥ तया पुंडलिकासाठीं । येऊनि उभें वाळवंटीं । दोन्ही कर ठेवुनि कटीं । प्रसन्न दृष्टि पाहातसे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

निर्विकल्प ब्रह्म कशानें आतुडें । जंववरी न मोडे मी तूं पण ॥१॥ शब्द चित्रकथा सांगती पाल्हाळ । मन नाहीं निश्चळ हरिच्या पायीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

निर्विकार असोनि आत्मा । अवघ्या भूतग्रामा प्रकाशी ॥१॥ एरवीं करी ना करवी । जेवीं रवि निज व्योमीं ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

निळा पंढरपूरचा लावण्यपुतळा । देखिलासे डोळां विठ्ठल देव ॥१॥ जीव वेधला वो वेधला वो । पाहतां पाहतां जीव वेधला वो ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ