भजनी मालिका
← भजनांकडे परत

निर्भीड बोलणें । ज्याचें अपस्वार्थी जिणें

nirbhid bolanen | jyachen apasvarthi jinen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
निर्भीड बोलणें । ज्याचें अपस्वार्थी जिणें ॥१॥ त्याचिये संगतीचे फळ । होय चित्तसी खळबळ ॥२॥ परदु:ख नेणतां । कर परान्नें पुष्टता ॥३॥ निळा म्हणे दावी सोंग । ऐसा त्यजावा मातंग ॥४॥