भजनी मालिका
← भजनांकडे परत

निर्लज्ज होऊनि नाचे महाद्वारी । वाचें वदे हरी सर्वकाळ

nirlajja houni nache mahadvari | vachen vade hari sarvakal

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
निर्लज्ज होऊनि नाचे महाद्वारी । वाचें वदे हरी सर्वकाळ ॥१॥ व्रत करी सदा नामाचें पारणें । अखंड तें तेणें रामकृष्ण ॥२॥ पंढरीची वारी घडे सर्वकाळ । कीर्तन कल्लोळ मुखीं सदा ॥३॥ एका जनार्दनीं भजनीं सादर । सर्व वेरझार खुंटे त्याची ॥४॥